Home latest News आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून साकारलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय जनसेवे...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून साकारलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय जनसेवे करीत लोकार्पित.

91
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून साकारलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय जनसेवे करीत लोकार्पित.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून साकारलेले ११५ खाटांचे कोविड रुग्णालय जनसेवे करीत लोकार्पित.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार निधीतून साकारलेले ११५ खाटांचे कोविड रुग्णालय जनसेवे करीत लोकार्पित.
✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- आमदार स्थानिक विकास निधी व उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकार करण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूर महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपूरावा सुरु होता तसेच या कामाकडे आमदार किशोर जोरगेवार यांचे लक्ष होते. मागील आठवडाभरापासून त्यांच्या वतीने सदर ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केल्या जात होती. येथील काम युध्द स्तरावर पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर अतिशय कमी वेळात या रुग्णालयाचे काम पुर्ण झाले असून या नव्या रुग्णालया मुळे सामान्य रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा मिळेल.