अलिबाग च्या कलाकाराच्या कलाकृतीचा जनतेने लाभ घ्यावा – आ.महेंद्र दळवी
आमदार महानाट्य करंडक २०२५ चा शुभारंभ
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित “आमदार महानाट्य करंडक २०२५” या दोनअंकी नाट्य स्पर्धेचा शुभारंभ भाग्यलक्ष्मी सभागृह येथे करण्यात आले.
याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, माजी जि. प. सदस्या मानसी दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, सिने नाट्य अभिनेते व स्पर्धेचे परीक्षक अनिल गवस व भरत सावळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी, सुरेश म्हात्रे, संजीवनी नाईक, अॅड. प्रसाद पाटील, संदीप गोठीवरेकर, रमेश धनावडे, आनंद कोळगावकर, कलारंगचे अध्यक्ष प्रकल्प वाणी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार महेंद्र दळवी व मानसी दळवी यांच्या शुभहस्ते रंगदेवतेचे पूजन करत श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तदनंतर अलिबाग तालुक्यामध्ये ग्रामीण रंगभूमीसाठी ज्यांनी कार्य केले अशा स्वर्गीय कलावंतांना तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना ॲड. प्रसाद पाटील यांनी शहरांमध्ये प्रथमच ग्रामीण कलाकारांसाठी आयोजित होणारी स्पर्धा हे विशेष आहे असे सांगितले. 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनी ग्रामीण कलावंतांचा सन्मान करण्यात आला आणि त्याचप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांसाठी अशी भव्य स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला होता, आणि तो प्रत्यक्षात साकारला जातोय या प्रति सर्व कलाकारांच्या वतीने आनंद व्यक्त केला. आजपर्यंत अलिबागच्या ग्रामीण भागामध्ये अनेक गावागावात सण उत्सवाला दरवर्षी दोन अंकी तीन अंकी संगीत नाटक अशा पद्धतीने नाट्य परंपरा जपणारी अनेक संस्था मंडळ आहेत त्या मंडळांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे या स्पर्धेत एकूण नऊ संस्था नाटके सादर करणार आहेत तरी समस्त अलिबाग कराणी याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन याप्रसंगी केले.
तसेच आमदार महेंद्र दळवी यांनी सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे माझा वाढदिवस कोणत्याही मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार नाही परंतु या स्पर्धेविषयी आधीच घोषणा करण्यात आली असून ग्रामीण भागातील कलाकार मागील अनेक दिवस परिश्रम घेत असल्याने ही स्पर्धा संपन्न करत आहोत असे सांगितले. परंतु सर्व कलाकारांचं कौतुक करून त्यांच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा देत असताना ग्रामीण भागामध्ये ज्या कलाकारांनी, ज्येष्ठ रंगकर्मींनी नाट्यपरंपरा जोपासली आहे त्यांच्या आठवणींना उजाळा देत या सर्व संस्थांचे अभिनंदन केले.
मोरया क्रिएशन, चौल निर्मित “आत्या आत या” या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. व सायं. खिडकी पंचक्रोशी नाट्य मंडळ प्रस्तुत “देव दरीच हाय..! ” हे नाट्य सादर झाले.
सदर आमदार महानाट्य कर्डक 2025 ही स्पर्धा दिनांक 11 मे ते 15 मे या कालावधीमध्ये संपन्न होणार असून दर दिवशी दोन नाटक व अंतिम दिवशी एक नाटक व सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार असून समस्त अलिबाग करांनी या स्पर्धेच्या दृष्टीने होणारे सादरीकरण पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ग्रामीण कलाकारांचे कौतुक करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी केले याप्रसंगी अलिबागच्या नाट्य चळवळीतील अनेक ज्येष्ठ कलाकारांसहित युवा वर्ग आणि प्रेक्षक उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार याने केले.