Home latest News तपस्वी गोंधळी सितारा युथ आयकॉन 2025 अवॉर्डने सन्मानित….

तपस्वी गोंधळी सितारा युथ आयकॉन 2025 अवॉर्डने सन्मानित….

651

तपस्वी गोंधळी सितारा युथ आयकॉन 2025 अवॉर्डने सन्मानित….

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९३२०३२५९९३

अलिबाग:- सितारा महिला विकास संस्था व सितारा महिला बचत गट महासंघाच्या वतीने भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राजयोग बँक्वेट हॉल शेवाळवाडी, हडपसर, पुणे या ठिकाणी सितारा विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आयशा तांबोळी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सितारा आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, मोहम्मद हजरत खलील खिस्ती, हडपसर विधानसभेचे अध्यक्ष शांतनु जगदाळे, आमदार योगेश टिळेकर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व बिग बॉस फ्रेम तृप्तीताई देसाई, रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 45 हजाराहून अधिक महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या, पथनाट्यातून विविध विषयांवर जनजागृती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी, लावणी सम्राट अश्मिक कामठे, माझी पोलीस महानिरीक्षक आयपीएस विठ्ठल जाधव, सुरेश आण्णा घुले यांना सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमात सिताराम मिस्टर अँड मिसेस या फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या स्पर्धेसाठी स्पर्धक आले होते.