Home latest News आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न कर्जत...

आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न कर्जत खालापूरमधील ४६२ गुणवंत विद्यार्थ्यांना केले सन्मानित

69

आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न

कर्जत खालापूरमधील ४६२ गुणवंत विद्यार्थ्यांना केले सन्मानित

आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न कर्जत खालापूरमधील ४६२ गुणवंत विद्यार्थ्यांना केले सन्मानित

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

कर्जत:-सन २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षात कर्जत विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी कर्जत विधानसभा मतदार संघाच्या पालकत्वाची यशस्वी जबाबदारी पार पाडणारे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४६२ विद्यार्थ्यांना विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी लागणार्या शासकिय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कर्जत खालापूर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील दहावी व बारावीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा गुरुवार दिनांक १३ जून रोजी २०२४ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कर्जतमधील रॉयल गार्डन मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी कर्जत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांबरोबर पुढील शैक्षणिक वाटचालीबाबत मनमोकला सुसंवाद साधला. त्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते व मार्गदर्शक गणेश शिंदे यांनी सत्कार सोहळ्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत त्यांना विविध विषयां संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, विजय पाटील, पंकज पाटील, शिवराम बदे, संभाजी जगताप, गजू वाघेश्वर, मनोहर थोरवे, संकेत भासे, प्रसाद थोरवे, राहुल विशे, पंढरीनाथ पिंपरकर, अभिषेक सुर्वे, किसन शिंदे, प्रभाकर देशमुख, मिलिंद विरले, संतोष कोळंबे, प्रविण थोरवे, हर्षद विचारे, गणेश केवारी, सुरेखा शितोळे, रेश्मा म्हात्रे, सचिन भोईर, प्रसाद पालकर, संतोष मोहिते, बापू चित्ते, आदींसह शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.