Home latest News इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

65

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर, : – चंद्रपुरातील रहमतनगरात शिरले पाणी चंद्रपूर येथील इरई धरणाचे सातही दरवाजे बुधवारी उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई तुडूंब भरून वाहत आहे. नदी काठावरील रहमतनगर भागातील अनेक घरी पुराचे पाणी शिरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 25 घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळा घुटकाळा व सरदार पटेल कन्या शाळा येथे या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खाजगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल 35 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे 2.0 मीटरने उघडण्यात आल्यानंतर पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन रहमत नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन चमूने बचाव कार्य सुरु केले आहे. येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा मनपामार्फत पुरविण्यात येत आहेत.गील सहा दिवसांपासून राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पूर आला असून कित्येक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुचना दिल्या असून, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धोकादायक नदी नाल्यांच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातून हैद्राबाद येथे जाणारी एक खाजगी बस जवळचा मार्ग म्हणुन राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे जात होती. दरम्यान रस्त्यातील नाल्याला जास्त पाणी असल्याने त्या मार्गाने बस नेऊ नये, अशी सूचना पोलिसांनी बस चालकला दिली होती. मात्र, त्याने ऐकले नाही. विरुर पोलिसांनी प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.