Home latest News वंचितच्या सायन कोळीवाड्याच्या अध्यक्षा सुगंधा सोंडे यांच्या पुढाकाराने आयटीआय विद्यार्थ्य़ासाठी प्रशिक्षण शिबिर

वंचितच्या सायन कोळीवाड्याच्या अध्यक्षा सुगंधा सोंडे यांच्या पुढाकाराने आयटीआय विद्यार्थ्य़ासाठी प्रशिक्षण शिबिर

76

संकलन सुरेश नंदिरे मुंबई✒
मुंबई, दि .13:- दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतिने सायन कोळीवाडा या ठिकाणी आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात आले. वंचितच्या सायन कोळीवाडा अध्यक्षा सुगंधा सोंडे यांनी याबाबत पुढाकार घेतला.

दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्य़ानी पुढे काय करावे हा प्रश्न नेहमी विद्यार्थी व पालकांना पडत असतो. त्यामुळे वंचित बहुजन महिला आघाडीच्या सायन कोळीवाडाच्या अध्यक्षा सुगंधा सोंडे यांनी अशा मुलांसाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थेबद्दल बद्दल माहिती देण्यात आली. आयटीआय मध्ये प्रवेश कसा घ्यावा, त्यासाठी काय करणे महत्त्वाचे आहे. आयटीआय करियरच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे. याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे या शिबिराला उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांनी सुगंधा सोंडे यांचे आभार मानले.