Home latest News महाराष्ट्र: मालेगावात आंदोलना दरम्यान हिंसाचार आणि दगड फेक, पोलीस कारवाई सुरु.

महाराष्ट्र: मालेगावात आंदोलना दरम्यान हिंसाचार आणि दगड फेक, पोलीस कारवाई सुरु.

73

महाराष्ट्र: मालेगावात आंदोलना दरम्यान हिंसाचार आणि दगड फेक, पोलीस कारवाई सुरु.

महाराष्ट्र: मालेगावात आंदोलना दरम्यान हिंसाचार आणि दगड फेक, पोलीस कारवाई सुरु.
महाराष्ट्र: मालेगावात आंदोलना दरम्यान हिंसाचार आणि दगड फेक, पोलीस कारवाई सुरु.

मिडिया वार्ता न्यूज ✒

मालेगाव:- मालेगावातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार, दगडफेक करण्यात आल्याने सर्वीकडे भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस विभागाने कारवाई सुरू केली असुन. हिंसक मोर्चानंतर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ काल मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारुन आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनातील बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली.

मात्र काही ठिकाणी या आंदोलनाला गाल बोट लागले आहे. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला.