Home latest News भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लँडमार्क केअर्स ‘मोबाईल मेडिकल युनिट’ (MMU) सेवेला...
*भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लँडमार्क केअर्स ‘मोबाईल मेडिकल युनिट’ (MMU) सेवेला प्रारंभ.*
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी: भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोफत व दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आज दिनांक 12/11/2025 रोजी लँडमार्क केअर्स आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोबाईल मेडिकल युनिट’ (MMU) सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या सेवेचे उद्घाटन मा.प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर, मा.अतिरिक्त आयुक्त श्री.विठ्ठल डाके, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.संदिप गाडेकर, लँडमार्क ग्रुपचे श्री.वैभव सावंत व श्री. संदीप कुरणे,पिरामल स्वास्थ संस्थेचे श्री.प्रमोद खरात, सौ.नीरजा वंकार, श्री.गणेश घुले व श्री शैलेश अनाभावे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मैदानावर संपन्न झाले. तसेच
या उपक्रमांतर्गत प्रत्येक MMU युनिट महानगरपालिका कार्यक्षेत्रातील २२ ठिकाणी नियमितपणे आरोग्य सेवा पुरवणार आहेत. प्रत्येक युनिटमध्ये डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, आरोग्य शिक्षक आणि पायलट यांचा समावेश असेल. या युनिटद्वारे नागरिकांना असंसर्गजन्य आजार तपासणी, औषधोपचार, आरोग्य शिक्षण, आवश्यक तपासण्या तसेच गरज पडल्यास उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये संदर्भ सेवा (Referral) देखील दिली जाणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्याचा प्रसार करणे हा, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून हा उपक्रम लाईफस्टाईल ग्रुपच्या सहकार्याने सुरु झाला आहे, तसेच पिरामल स्वास्थ ही त्याची अंमलबजावणी भागीदार संस्था आहे. तरी सर्व नागरिकांनी या लँडमार्क केअर्स ‘मोबाईल मेडिकल युनिट’ सेवेचा अधिकाधिक लाभ घेण्यात यावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांनी केले आहे.