Home latest News रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेचा आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेचा आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

87

रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेचा
आदिवासी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त रवींद्र राऊत इंग्लिश मीडियम स्कूल (कोकण उन्नती मित्र मंडळ संस्था) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद कार्ले येथील आदिवासी वाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका नियती रिकामे, उपमुख्याध्यापिका नादिया लोगडे, शिक्षिका शिल्पा पळधे व विध्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन, शाळेच्या बॅगा, रंगीत पेन्सिली, पाणी बॉटल आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला होता.

कार्यक्रमाचे आयोजन “सर्वांसाठी शिक्षण, ज्ञानासाठी समान संधी” या भावनेतून करण्यात आले होते. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचविणे, तसेच त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

या प्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकांनी रवींद्र राऊत इंग्रजी माध्यम शाळेचे आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.