पहेल ग्रामपंचायत रणधुमाळीत शिंदे गटाला खिंडार

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वत्र रणधुमाली चालू असताना माणगांव तालुक्यातील पहेल ग्रामस्थाचा शिंदे गटाला राम राम करत शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश करण्यात आला. गोगावले चा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सरपंचपदाच्या उमेदवार करिष्मा प्रसाद मांजरे, शाखा प्रमुख प्रसाद मांजरे यांच्यासह पहेल ग्रामस्थाचा मोठया संख्येने ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्यात आला.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे गटातून ठाकरे गटात पहेल ग्रामस्थानी प्रवेश केल्याने आमदार भरतशेठ गोगावले यांना त्याच्यात मतदान सघात मोठा धक्का बसला असून येत्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, विधानसभा समन्वयक सीताराम मेस्त्री, विधानसभा संघटक संजय घोसाळकर, जिल्हा अधिकारी बंटी पोटपोडे तालुका प्रमुख गजानन अधिकारी याच्यासह तमाम शिवसैनिक शेकडो च्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.








