Home latest News सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगडची ऐतिहासिक

सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगडची ऐतिहासिक

219

सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगडची ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम यशस्वी

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन – रायगड – पन्हाळा, पावनखिंड ते विशाळगड अशी तब्बल ६२ कि.मी. अंतराची ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगड या ग्रुपने दिनांक ८ ते १० जानेवारी या तीन दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण केली.

सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरदऱ्यांतून, ऐतिहासिक पायवाटांवरून दिवस-रात्र चालत ही मोहीम पूर्ण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेल्या या मार्गावरून चालताना इतिहासाचा साक्षात्कार व्हावा, इतिहास समजून घ्यावा आणि तो जपण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती.

मोहीमेदरम्यान अनेक नैसर्गिक व शारीरिक अडथळे आले, मात्र सर्व संकटांवर मात करत सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी जिद्द, संघभावना आणि शिस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडवले. या यशस्वी मोहिमेसाठी विविध स्तरांतून मोलाची मदत लाभली.

या मोहिमेसाठी नगराध्यक्ष मा. श्री. अतुलभाई चौगुले, उपनगराध्यक्ष मा. श्री. अनंत दादा गुरव, मा. श्री. शिवराजभाई चाफेकर, मा. श्री. प्रसाद दादा भुवड, मा. श्री. सुनील वाणी व मा. श्री. काशीनाथ दादा गुरव यांनी सहकार्य केले.

सह्याद्री ट्रेकर्स श्रीवर्धन रायगड या ग्रुपकडून यापूर्वीही दुर्गसंवर्धन, स्वच्छता, ऐतिहासिक जनजागृती यांसारख्या अनेक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेमुळे तरुण पिढीत इतिहासप्रेम आणि दुर्गसंवर्धनाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे.