समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना डि.लीट. सन्मान.

53

समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना डि.लीट. सन्मान.

 Social worker Shankar Baba Papalkar has been given D.Litt. Honor.
अमरावती:- संत गाडगे बाबा विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या सभेमध्ये वझ्झर, अचलपूर येथील स्व अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे (अनाथालय) संचालक व प्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची डि.लीट मानद पदवीकरिता एकमताने निवड करण्यात आली.

समाजकार्यामध्ये बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. 37 व्या दीक्षांत समारंभामध्ये त्यांना सन्मान डि.लीट मानद पदवी प्रदान केल्या जाणार आहे. अधिसभेच्या सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यापूर्वी विद्यापीठाने चार व्यक्तींना डि.लीट मानद पदवी दिली आहे. त्यात माजी राष्ट्रपती व्येंकट रमण, निर्मला देशपांडे, आशा भोसले, व्ही. बी. कोलते यांचा समावेश आहे.