Home latest News चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

68

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 70 कोरोनामुक्त ; 118 पॉझिटिव्ह

आतापर्यंत 23,471 जणांची कोरोनावर मात, ॲक्टीव पॉझिटिव्ह 905

70 corona free in last 24 hours in Chandrapur district; 118 Positive

✒सौ हनिशा दुधे ✒
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 14 मार्च :- जिल्ह्यात मागील 24 तासात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 118 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 471 झाली आहे. सध्या 905 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 31 हजार 924 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख पाच हजार 271 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 364, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 118 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 41, चंद्रपूर तालुका 16, बल्लारपूर दोन, भद्रावती 10, ब्रम्हपुरी 15, नागभिड चार, मूल तीन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा चार, वरोरा 11, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.