Home latest News टिटवाळ्यात अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे अपघातांत वाढ; त्रस्त नागरिकांचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

टिटवाळ्यात अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे अपघातांत वाढ; त्रस्त नागरिकांचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

12

दि.९,टिटवाळा (ठाणे) : टिटवाळ्याच्या प्रसिद्ध महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. महागणती मंदिर परिसरामध्ये रखडलेल्या कामामुळे रिक्षा चालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. मंदिराच्या शेजारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात. रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे अनेकदा भाविकांचा, रिक्षा चालकांचा आणि नागरिकांचा सुद्धा अपघात होतो.

टिटवाळ्यातअपघातांच्या घटना या वारंवार घडत असताना त्रस्त नागरिकांनी आता मोठे थेट जन आंदोलन करण्याचाच इशारा पालिकेले दिला आहे.⁷महानगर पालिकेकडून गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये खोदकामांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिक आणि रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत.महागणपतीच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच रस्ता खोदण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेकडून रस्त्याचे काम सुरू आहे. इतके दिवस उलटूनही रस्त्याचे काम न झाल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दुचाकी स्वारांमध्ये अपघाताचा धोका आहे. अर्धवट काम झालेल्या रस्त्यावरून दुचाकी चालवताना बाईकस्वारांना विशेष मेहनत घ्यावी लागते. सुट्टीच्या दिवशी, विकेंडला महागणपतीच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. गर्दीच्या वेळी अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडतात. कायमच रहदारी असलेल्या ह्या रस्त्यावरून रोज शेकडो लोकं प्रवास करतात.

संजय पंडित