Home latest News नाकाबंदी दरम्यान यशोधरानगर पोलीसांनी पकडला देशी दारूचा अवैध साठा, एका आरोपीस केली...

नाकाबंदी दरम्यान यशोधरानगर पोलीसांनी पकडला देशी दारूचा अवैध साठा, एका आरोपीस केली अटक.

72

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (नागपूर) :- यशोधरानगर पोलीसांनी गुरूवार दि. 10 जुन रोजी नाकाबंदी करीत असतांना एका आरोपीला दुचाकीवर अवैधरित्या देशीदारूच्या साठ्यासह रंगेहात अटक केली आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोमनाथ गोदी, वय 53 वर्षे असे आहे. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून देशीदारूच्या 98 बाटल्या जप्त केल्या आहेत.

तो भुमी आखाडाच्या गेट समोरून जात असल्याचे पोलीसांना दिसताच त्याला अटक केली. यशोधरानगर पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी आणि देशीदारूच्या बाटल्यांसह एकुण ५० हजार ७६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कामगिरी पोलीस उपायुक्त श्री निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री राजेन्द्र कुमार सानप यांचे नेतृत्वात डिबीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.