Home latest News शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं… श्री सिद्धी हॉटेलचे मालक...

शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं… श्री सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे काळाच्या पडद्याआड

74

शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं…

श्री सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे काळाच्या पडद्याआड

शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं... श्री सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे काळाच्या पडद्याआड

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा: म्हसळा शहरातील एक यशस्वी उद्योजक व श्री सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे आज दि. १४ जुन रोजी पहाटे अकस्मित निधन झाले, म्हसळा तालुक्यात कापरे यांच्या निधनाची बातमी समजतात राजकीय, उदयोग, शासकीय, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कापरे यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत कापरे यांचे अंतिम दर्शन घेतले, शहरात शोकाकुळ वातावरण होऊन अनेकांचे डोळे पाणावले होते व एक मित्रत्वाचे व बंधुत्वाचे नाते जपणारे व सर्वांना सहकार्य करणारे व सामाजिक क्षेत्रात देखील मोलाचे योगदान देणारे तसेच कुठेही भेटल्यावर आपुलकिने विचारपुस करणारे कापरे शेठ आपल्या मधुन कायमचे निघुन गेले आहेत या बद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रकांत कापरे यांनी खुप मेहनत घेऊन अगदी शुन्यातुन विश्व निर्माण केले होते, एक यशस्वी उद्योजक व श्री सिद्धी हॉटेलचे मालक होते,तसेच कापरे यांची राजकिय क्षेत्रात देखील एक वेगळी ओळख होती, खासदार सुनिल तटकरे यांच्याशी जवळचे संबंध असले तरी सर्व पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी देखील अगदी जवळचे नाते होते,कापरे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजई,बहिण, मित्र, असा मोठा परिवार आहे.