स्टेअर्स च्या महाराष्ट्र राज्य कराटे राज्य उपाध्यक्ष पदी शिहान गणेश मंगल गिरी यांची निवड
लातूर: कराटे या क्रीडा प्रकाराचा राज्यभर प्रचार व प्रसार करण्यासाठी युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय खेल संवर्धन संस्था NSPO ची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन च्या महाराष्ट्र राज्य कराटे राज्य उपाध्यक्ष पदी लातूरचे सुप्रसिद्ध कराटे ,योग, जीत कुने दो प्रशिक्षक शिहान गणेश मंगल गिरी यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड मुंबई येथे स्टेअर्स महाराष्ट्र राज्याचे कराटे प्रमुख शिहान विशाल जाधव सर तसेच स्टेअर्स महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा समिती चेअरमन क्योशी राजकपूर बागडी सर यांच्याद्वारे करण्यात आली,
शिहान गणेश मंगल गिरी यांच्या स्टेअर्स च्या महाराष्ट्र राज्य कराटे राज्य उपाध्यक्ष पदी झालेल्या निवडी मुळे महाराष्ट्रातील कराटे खेळाडूंना स्टेअर्स (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय खेल संवर्धन संस्था NSPO ) च्या माध्यमातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय कराटे स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.
तसेच मुलींना व महिलांना स्वतःचे स्वरक्षण करता यावे यासाठी महाराष्ट्रात स्टेअर्स दुर्गाशक्ती नावाने राज्यभर मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर देखील घेतली जाणार आहेत.