शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता 17 फेब्रुवारीला वर्धा शहरात बाईक रॅली, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.

48

आशीष अंबादे प्रतिनिधी
वर्धा:- केंद्र शासनाने मंजूर केलेले तीनही शेतकरीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याकरीता येत्या 17 फेब्रुवारीला शहरात बाईक रॅली काढण्यात येणार असून रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीने केले आहे.
17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून दुपारी दोन वाजतापर्यंत ही बाईक रॅली शहरातील विविध मार्गाने फिरणार आहे. बजाज चौकातील शेतकरी आंदोलनाच्या स्थळापासून दुपारी 12 वाजता सुरू होणारी ही रॅली शास्त्री चौक, गौरक्षण चौक, हिंदनगर चौक, रामनगर येथील शहीद भगतसिंग यांचा पुतळा ते गजानन सायकल स्टोअर्स येथून वंजारी चौक, आर्वीनाका,कारलाचौक मार्गे आर्वी नाका, दादाजी धुनिवाले चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोशॅलिस्ट चौक, अंबिका चौक,इतवारा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने जात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाईल आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्यानंतर झाशी राणी चौक चौकातून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्गाने जमनालाल बजाज चौक येथे शेतकरी आंदोलनाच्या स्थळी येत बाईक रॅलीचा समारोप होईल. शेतकरी आंदोलनात सहभागी विविध संघटनांसह कामगार तसेच शेतकरी पुत्रांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.