Home latest News वर्धा येथे मेहुण्याने केला जावयाचा खुन.

वर्धा येथे मेहुण्याने केला जावयाचा खुन.

77

वर्धा येथे मेहुण्याने केला जावयाचा खुन.

A ruthless mother kills her 6-year-old son by slitting his throat to sacrifice to Allah.
आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- येथे परीवाराच्या वादातून रागाच्या भरात मेहुण्याने चाकुने वार करुन जावयाची निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घळली. वर्धा शहरातील पुलफैल परिसरात दुपारी 2.30 वाजता ही खुनाची घडली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वादातून रागाच्या भरात मेहुण्याने चाकुने वार करुन जावयाचा खून केला. माहिती होताच पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलफैल येथील आरोपी अजय भूरे वय 21 च्या बहिणीला मृतक अमीत रत्नाकर निमसडे वय 28 वर्ष याने आठ वर्षापुर्वी पळवुन नेले होते. दोघांनी विवाह करुन परिसरातच रहात होते. यामध्ये त्यांना दोन मुली व एक मुलगा झाला. परंतु मागील दिड महिन्यांपासुन पति पत्नी मध्ये वाद होत असल्याने अजयची बहीण त्याच्या घरी रहायला आली होती. अशातच आज रविवारी दुपारी 2.30 वाजता अजय हा अमीतच्या घरी गेला. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात अजय ने अमीतवर चाकुने वार केले. यामध्ये अमीतचा जागीच मृत्यू झाला.
  
माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनची चमु घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट देत योग्य सुचना दिल्या.पोलिसांनी आरोपी अजय भुरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास एपीआय किन्नाके करीत आहे.