इरई धरणाच्या जलसाठ्यात पुन्हा वाढ,15 व 16 ला जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ 

अश्विन गोडबोले

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

📱 8830857351

चंद्रपूर,14 सप्टेंबर: सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 10 धरणात 14 सप्टेंबरपर्यंत 94.6 टक्के जलसाठा जमा झाला आहे. असोलामेंढा, नलेश्वर, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव ही धरणे तुडूंब भरली आहेत. तर, चंदई धरणात 98.6, चारगाव 95.30, इरई 94.92, तर घोडाझरी धरणात 84.58 टक्के पाणी साठा आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 15 ते 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्याकरिता ‘ऑरेंज अलर्ट’ असून, या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here