लॉयड्स मेटल्स कंपनीच्या मालकीचा तांबा चोरट्यांना अटक, 50 किलो तांब्यासह 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

घुग्घुस, 14 ऑक्टोबर: येथील लॉयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरातून तांबा चोरून नेणार्‍या दोन चोरट्यांना घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 50 किलो तांब्यासह 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

येथील लॉयड्स मेटल्स कंपनीतील जळालेल्या विद्युत रोहीत्राचे तांब्याचे पट्टे व तार कापून कंपनी परिसरातील सायकल स्टॅन्डजवळ ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास 50 किलो तांब्याचे पट्टे व तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. गुरुवारी सकाळी पर्यवेक्षक त्याठिकाणी गेले असता तांब्याचे पट्टे व तार चोरीस गेल्याचे दिसले. याबाबत सुरक्षा प्रभारी प्रमोद सोनाजी नाकाडे यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 (34) गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी इसाक इकबाल शेख (28, रा. वॉर्ड क्रमाक 2, घुग्घुस) व सुरज संतोषसिंग कुंवर (23, रा. बँक ऑफ इंडिया मागे, घुग्घुस) यांना गुरुवारी सायंकाळी घुग्घुस येथून अटक केली. आरोपीकडून 50 किलो तांब्याचे पट्टे व 20 हजार रुपयांची तार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, रंजित भुरसे, नितीन मराठे, सचिन वासाडे, रवी वाभीटकर यांनी केली. पुढील तपास पोलिस हवालदार महेंद्र भुजाडे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here