Home latest News उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परवाना शिबिर

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परवाना शिबिर

72

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परवाना शिबिर

श्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

 मो: 8830857351

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जिल्ह्यांतर्गत परवाना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत 17 ऑक्टोबर रोजी वरोडा येथील आनंद निकेतन महाविद्यालय, 18 ऑक्टोबर रोजी ब्रम्हपुरी येथील एनएच महाविद्यालय, 19 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी, 20 ऑक्टोबर रोजी गडचांदूर येथील शरद पवार महाविद्यालय, तर 21 ऑक्टोबर रोजी चिमूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉइंटमेंटनुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.