शेतकऱ्यांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत चालू करा, शेतकरी पुत्रांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. 

56

शेतकऱ्यांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत चालू करा, शेतकरी पुत्रांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. 

दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास शेतकऱ्यांचे रुम्हणे आंदोलन

Turn off the uninterrupted power supply to the farmers, sit-in agitation of the farmers' sons at the MSEDCL office.
Turn off the uninterrupted power supply to the farmers, sit-in agitation of the farmers’ sons at the MSEDCL office.

प्रदिप शिंदे प्रतिनिधी

भोकरदन:- महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कलेक्शन तोडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत चालू करा या मागणीसाठी भोकरदन येथील महावितरण कार्यालयात शेतकरी पुत्रांनी ठिय्या आंदोलन करून उपकार्यकरी अभियंता दिपक तुरे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांचा वीज पुरवठा राज्य सरकार व महावितरण ने खंडित केल्यामुळे हाती आलेली पीके विहरीत पाणी असून सुद्धा विजेअभावी सुखु लागले आहेत. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरित खंडित केलेला विद्युत पुरवठा दोन दिवसांत सुरळीत न केल्यास दि 18 फेब्रुवारी गुरुवार रोजी महावितरण कार्यालयात सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या वतीने रुम्हणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, विकास जाधव, सिरसगाव मंडपचे सरपंच सुरज सहाणे, बरंजळा साबळेचे सरपंच नारायण साबळे, प्रदिप शिंदे, संदिप भोकरे, अजहर शेख, रवींद्र मोरे, अनिल साबळे, आप्पासाहेब जाधव, अजिनाथ सहाणे, प्रदिप लोखंडे, तुळशीराम साबळे, जगदीश सहाणे, आप्पासाहेब सहाणे, बाबासाहेब शिरसाट, गणेश लोखंडे, ईश्वर इंगळे, राजू ढोके आदी शेतकरी पुत्रांच्या सह्या आहेत. 

Turn off the uninterrupted power supply to the farmers, sit-in agitation of the farmers' sons at the MSEDCL office.
Turn off the uninterrupted power supply to the farmers, sit-in agitation of the farmers’ sons at the MSEDCL office.

अगोदरच शेतकरी अतिवृष्टीमुळे तर कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असतांना वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम संबधित विभागाने केल्याचा आरोप निवेदनात केलेला आहे. शेतकरी वीज बिल भरतील परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सत्तेवर बसण्याआगोदर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्ट्री 25 हजारांची मदत जाहीर केली होती. ती मदत वीजबिल भरण्यात वर्ग केल्यास आमची काही हरकत राहणार नाही असे शेतकरी पुत्रांनी निवेदनात नमूद केले आहे. निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्ष वीजबिल माफीची पोकळ आश्वासने देतात त्यामुळे शेतकरी संभ्रमात राहतो. निवेदनात म्हटले आहे की उच्च न्यायालय खंडपीठाच्या निर्णयाला अधीन राहून तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रचेखर बावनकुळे यांनी 1 ऑक्टोबर 2018 रोजी महावितरण पुढील आदेश येईपर्यंत शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडू नयेत असा आदेश दिला होता. तो आदेश अद्याप संपुष्टात आला नाही.

सध्या महाविकास आघाडीतील मंत्री आमदार शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन करत आहे, मात्र मागील सहा वर्षांपासून जास्तीचे बिले आकारून सुद्धा वीज बिल भरा असे सांगण्यात काही तथ्य नाही. शेतकऱ्यांना कोणतेही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करता येत नाही. वीज कायदा कलम 2003 नुसार थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करायचा असेल तर 15 दिवस अगोदर त्यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांना भीती दाखवून विद्युत रोहित्र बंद करण्याचा अधिकार वीज मंडळास नाही. पुरवठा खंडित झाल्यापासून 48 तासांत सुरू करणे आवश्यक आहे त्यास विलंब झाल्यास प्रतितास दंडाची तरतूद देखील आहे. तसेच यामुळे जर एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केली तर याला जबाबदार महावितरण व राज्य सरकार राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

वेगवेगळ्या घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या,आमचं जगणं मान्य करा, जय जवान जय किसान, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत चालू करा अश्या घोषणांनी परीसर दणाणून गेला होता. यावेळी तरुणांनी उपकार्यकारी अभियंता दिपक तुरे यांना चांगलेच धारेवर धरले. उपकार्यकरी अभियंता दिपक तुरे यांना निवेदन देतांना व ठिय्या आंदोलन करतांना नारायण लोखंडे, विकास जाधव, सुरज सहाणे, नारायण साबळे, प्रदिप शिंदे आदी