दाखणे खर्डी बुद्रुक व कोशिंबळे तर्फे निजामपूर या गावांमध्ये विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या मार्फत 2100 झाडांची लागवड

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-इंदापूर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रुप ग्रामपंचायत दाखणेचे लोकप्रिय कार्यसम्राट माजी सरपंच विश्वास उभारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवत असताना दाखणे खर्डी व कोशिंबळे गावातील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग तसेच खास मुंबईकर चाकरमानी या या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थित होते. दाखणे ग्रामपंचायत मध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली असून नव्याने झालेले डांबरी रस्ते त्याचप्रमाणे गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. समस्त मानव जातीला उन्हाची झळ बसत असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत जात आहे आणि आणि असाच उन्हाचा पारा चढत राहिला तर भविष्यात खूप मोठ संकट समस्त मानव जातीवर वाढवणार आहे… त्यासाठी प्रत्येक गोष्ट सरकारकडून प्रशासनाकडून होईल ह्या आशेवर न थांबता प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे कम प्राप्त ठरतं. याच भावनेतून विश्वास उभारे प्रतिष्ठानच्या सभासदांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा पहिलाच सामाजिक उपक्रम दाखणे ग्रामपंचायत वासियाने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत यशस्वीरित्या पार पाडला. यामध्ये आबाळवृद्ध सहभागी होत असताना महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
विश्वास उभारे मागील पाच वर्षे दाखणे ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून धुरा सांभाळत असताना अनेक नवनवीन उपक्रम या ग्रामपंचायत मध्ये पार पडले आहेत. मागील वर्षी वटपौर्णिमेच्या सणानिमित्त खर्डी बुद्रुक या गावातील समस्त महिलांना 80 वड या वृक्षाचा वाटप करून उपक्रम राबवला होता. त्याचप्रमाणे खर्डी बुद्रुक गावातून लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाताना दोन झाड लावली जातात. तर ज्या वेळेला एखादी मुलगी गावात नव्याने सून म्हणून येते त्यावेळी दोन झाडे लावली जातात. व त्याची जोपासना मनापासून केली जाते… अशाप्रकारे एक नवचैतन्याचा वातावरण संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळतो. अशा नवीन आणि सामाजिक हिताच्या उपक्रमासाठी नागरिकांकडून सुद्धा तेवढाच तोलामोलाचा सहकार्य विश्वास उभारे यांना लाभलं जाते.आज सहभागी झालेल्या सर्व सभासदांना नागरिकांना विश्वास उभारे यांच्याकडून खास धन्यवाद देण्यात आले.








