बल्लारपूर येथे ठिकठिकाणी स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर; दि,15:- बल्लारपूरला गौरक्षण वॉर्ड येथे राज युवा ग्रुप चे अध्यक्ष नीरज झाडे यांनी 75 व स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करण्यात आला येथे उपस्थित मान्यवर श्री.पुरुषोत्तम नागतुरे, माजी जमादार नगरपालिका यांचा आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले व यांचा शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला व त्यावेडी भारताने भारतातल्या क्रांतिवीरांनी किती संघर्ष केले तेव्हा आपला भारत इ.स.1947 रोजी स्वतंत्र झाला तेही माहिती दिली ,गौरक्षण वॉर्डच्या प्रनागनाथ वॉर्डातील वरीष्ठ नागरिक व युवा लहान मुले उपस्थित होते
75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रविवारी सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी गृहसंकुलांमध्येही स्वतंत्र भारताचा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याची जाणीव मनात अधिकच अधोरेखित करणारा हा तिरंगा सूर्यास्तापर्यंत ठिकठिकाणी डौलाने फडकत होता. अनेकांच्या कपड्यांवर, गाड्यांच्या डॅशबोर्डवर, खिडक्यांच्या गजावरही तो दिमाखाने विराजमान झाला होता.