Home latest News नागपुरात पाकिस्तानी ग्रुपशी संबंधित शिक्षक आणि व्यापाऱ्याची एटीएसकडून चौकशी

नागपुरात पाकिस्तानी ग्रुपशी संबंधित शिक्षक आणि व्यापाऱ्याची एटीएसकडून चौकशी

49

नागपुरात पाकिस्तानी ग्रुपशी संबंधित शिक्षक आणि व्यापाऱ्याची एटीएसकडून चौकशी

 

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

नागपूर .ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक चौकस झाल्या आहेत. पाकिस्तान संबंधित बारीकसारीक संशयास्पद हालचालीवर तपास यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यातूनच आज नागपुरातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कामठीतील एक शिक्षक आणि एका व्यापाऱ्याला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.दोन्ही व्यक्ती सोशल मिडियावर पाकिस्तानातील एका ग्रुपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसला काही दिवसांपासून शहरातील काही व्यक्ती सोशल मिडियाद्वारे पाकिस्तानातील काही व्यक्तींशी बोलत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक तपास करीत,पथक दोन दिवसांपासून कामठीतील दोन व्यक्तींच्या मागावर होते.

त्यानंतर शनिवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एटीएसच्या पथकाने कामठीत छापा टाकून दोघांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यातील ४२ वर्षीय व्यक्ती एका शाळेत शिक्षक तर ४० वर्षीय व्यक्ती व्यापारी आहे. त्यांनी सोशल मिडियावरील एका ॲपद्वारे पाकिस्तानातील व्यक्तीशी बोलल्याची माहिती तपासात समोर आली. चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाइलचा डेटा आणि इतर माहितीही पथकाने जाणून घेतली. त्यानंतर त्यांना सायंकाळी सोडून देण्यात आले.

बरुआला शोधण्यात एटीएस अपयशी

बांगलादेशी नागरिक असलेला जोयसन चौधरी पी. सुनील चौधरी बरूआ (वय ४१, रा. न्यू बगडगंज, लकडगंज) याच्याविरोधात असे बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. १९ ऑगस्टला दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोयसन हा सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील विभागीय पासपोर्ट कार्यालयात आला.

तो अधिकारी संदीप मुन्नर यादव (वय ३५) यांना भेटला. ‘मी मूळ बांगलादेशचा नागरिक आहे. २०१४ पासून भारतात राहतो. मी बनावट दस्तऐवज तयार केले असून मला भारतीय नागरिकत्व हवे आहे,’ असे म्हणत त्याने यादव यांना दोन पासपोर्ट दिले. भारतीय पासपोर्ट बघून यादव यांना धक्का बसला. त्यांनी त्याला भारतीय पासपोर्टबाबत विचारणा केली. बनावट दस्तऐवजाद्वारे मी हे पासपोर्ट तयार केल्याचे जोयसन याने यादव यांना सांगितले. त्यानंतर जोयसन हा कार्यालयातून निघून गेला. पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बरूआ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, एटीएसलाही त्याचा अद्याप सुगावा लागलेला नाही.