सासुसोबत झालेल्या वादातून महिलेने एकवर्षीय चिमुकल्या मुलाचा विष पाजुन केला खून
आणि स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
नागपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की रामटेक तालुक्यातील बनपूर येथे सासुसोबत झालेल्या वादातून महिलेने एकवर्षीय चिमुकल्या मुलाचा विष पाजुन खुन केला.त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.ही थरारक घटना रामटेकपासून 15km अंतरावरील बनपुरी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वेदांत रामकृष्ण घावडे (वय 1 वर्ष) असे मृतकाचे तर प्रणाली घावडे असे त्या आईचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामकृष्ण घावडे हे शेती करतात.3 वर्षांपूर्वी त्यांचे प्रणालीसोबत लग्न झाले.शुक्रवारी दुपारी प्रणालीचा सासुसोबत वाद झाला.वाद विकोपाला गेला.यातुन प्रणालीने सासुला आत्महत्येची धमकी दिली.सायंकाळी वेदांत घरात खेळत होता.प्रणालीने त्याला उचलुन जवळ घेतले व विष पाजले.त्यानंतर थोडाच वेळात स्वत:ही विष प्यायले.नातेवाइकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी धावाधाव केली.दोघांचीही प्रकृती खालावली होती.नातेवाइकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी वेदांतला याला मृत घोषित केले.