Home latest News कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत अचानक बेपत्ता

कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत अचानक बेपत्ता

71

कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत अचानक बेपत्ता

कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत अचानक बेपत्ता

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की कळमना हद्दीत राहणारी १६ वर्षांची मुलगी प्रियकरासोबत अचानक बेपत्ता झाली.चिंतातुर आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.पोलिसांनी गांभीर्य दाखवुन तिचा तब्बल २ वर्षांनी शोध लावला.त्या मुलीला एका वर्षाच्या बाळासह पोलिसांनी ताब्यात घेतले तर प्रियकराला अटक केली.गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाच्या सकारात्मक भुमिकेमुळे वृद्ध आई-वडिलांना मुलगी परत मिळाली,त्यामुळे नागपुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.वसीम खान कय्युम खान असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
२ एप्रिल २०१९ रोजी आरोपी वसीम खानने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.तिला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेले.याप्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कळमना पोलिसांनी मुलगी आणि आरोपीचा शोध घेतला असता दोघेही मिळुन आले नाही.त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेच्या AHTU कडे देण्यात आला.संशयित आरोपीच्या राहत्या ठिकाणी शोध घेतला असता दोघेही मिळुन आले नाही.त्यानंतर मुलगी ही नंदसैनी, जि.कोसंबी(उत्तर प्रदेश) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यामुळे २ दिवसांपूर्वी पोलिसांचे एक पथक कोसंबीला रवाना झाले.