Home latest News बी.एस.एन.एल. ग्राहकांनी खोट्या एस.एम.एस. पासुन सावध राहावे.

बी.एस.एन.एल. ग्राहकांनी खोट्या एस.एम.एस. पासुन सावध राहावे.

86

बी.एस.एन.एल. ग्राहकांनी खोट्या एस.एम.एस. पासुन सावध राहावे.

BSNL Customers send fake SMS Beware of.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 17 मार्च:- के. वाय. सी. अपडेट करण्याच्या नावाखाली बी.एस.एन.एल. ग्राहकांना खोटे एस.एम.एस. प्राप्त होत असून यामध्ये समाजकंटकांडून विशेष नंबर वर के.वाय.सी. विवरण शेअर करण्याविषयी व तसे न केल्यास सीमकार्ड बंद करण्यात येईल असा संदेश देण्यात येत आहे. हे एस.एम.एस. सी.पी.-एस.एम.एस.एफ.एस.टी., अे.डी.-व्ही.आय.आर.आय.एन.एफ., सी.पी.-बी.एल.एम.के.एन.डी., बी.पी.-आय.टी.एल.आय.एन.एन. येथून येत आहेत.

यासंबंधात बीएसएनएलने असे मेसेज पाठविण्यात आले नसल्याचे कळविले असून ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या केवायसी माहितीचा उपयोग बैंक खात्यातुन पैसे काढण्यासाठी होऊ शकतो व आपली फसवणुक होऊ शकते. तरी ग्राहकांनी अशा संदेशावर लक्ष न देता आपले के.वाय.सी. विवरण कोणासोबत शेयर करु नये, असे दूरसंचार कार्यालयाचे मंडल अभियंता राजेश शेन्डे यांनी कळविले आहे.