Home latest News जुन्नर नगरपालिकेच्या दैनंदिन बाजार भुईभाडे लिलावातून ९ लाख ८ हजारांची विक्रमी कमाई

जुन्नर नगरपालिकेच्या दैनंदिन बाजार भुईभाडे लिलावातून ९ लाख ८ हजारांची विक्रमी कमाई

15

जुन्नर शहराच्या नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या कालावधीत जुन्नर शहरातील फेरीवाले, पथारी, हातगाडी वाले यांच्याकडून दैनंदिन बाजार भुईभाडे फी वसुलीचा जाहीर लिलाव करण्यात आला.

त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे “न खाऊंगी, ना खाने दूंगी” या तत्त्वामुळे सदरच्या लिलावामध्ये जुन्नर नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये मोठी भर पडली आहे. नागरिकांच्या हिताच्या कामासाठी दोन लाख आठ हजार रुपयांची जास्तीची भर पडली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील वर्षी हा लिलाव फक्त ७ लाख रुपयांना गेला होता. त्याची मुदत संपल्यानंतर नगरपालिका कर्मचारी दैनंदिन भुईभाडे गोळा करीत असताना नगरपालिकेच्या तिजोरीत केवळ दररोज ७०० ते १००० रुपये अशी तुटपुंजी रक्कम जमा होत होती.

ही बाब नगराध्यक्ष सुजाता काजळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे हाच लिलाव ९ लाख ८ हजार रुपयांवर गेल्याने नगरपालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली असून आजच्या या लिलावामध्ये मोठा फायदा झाल्याची माहिती नगराध्यक्ष सुजाता काजळे यांनी दिली.

प्रकाश सोनवणे