Home latest News जल पाणी योजनेचे अनेकदा उद्घाटन होऊनही म्हसळा शहर तहानलेले; तात्काळ उपाययोजनांची मागणी

जल पाणी योजनेचे अनेकदा उद्घाटन होऊनही म्हसळा शहर तहानलेले; तात्काळ उपाययोजनांची मागणी

13

म्हसळा : संतोष उध्दरकर.

म्हसळा:म्हसळा नगरपंचायतीचे नाट्यमय राजकीय घडामोडी बदलत असल्याने म्हसळा नगर पंचायतीचा नगराध्यक्ष कोण या बाबत सध्या चर्चा रंगत असली तरी सामान्य जनतेकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पाच ते सहा दिवसापूर्वी म्हसळा तालुक्यासह शहरात धुळीचे वादळ निर्माण होऊन काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्या सह पाऊस पडला असून म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणारा पाभरा धरण येथील पंप जळाल्याने शहरातील पाणी पुरवठा खंडित होऊन गेली चार दिवस म्हसळा शहरातील पाणी प्रश्न गंभीर होऊन पाण्यासाठी लोकांची वणवण होऊ लागली. दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. यावेळी पाणी प्रश्न घेऊन म्हसळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल सायकर यांनी म्हसळा नगरपंचायत यांना लेखी निवेदन देऊन तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करा या बाबतीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित विशाल सायकर, कौस्तुभ करडे आदी उपस्थित होते.

जल पाणी योजनेचे अनेक वेळा उद्घाटन होऊन सुद्धा म्हसळा शहरातील जनता तहानलेलीच आहे. एक पंप जळाला आहे पण अजून एक पंप आपत्कालात ठेवणे गरजेचे होते. ज्या प्रकारे भरमसाठ पाणी पट्टी, घरपट्टी घेतात त्याप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडवा. प्रत्येक विभागात पाणी येत आहे की नाही हे कोण बघणार? सर्व नगरसेवक आता व्यस्त आहेत. लवकरच पाणी सुरळीत करा.

विशाल सायकर

  1. सामाजिक कार्यकर्ते.