Home latest News चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी मोदींना लिहिले रक्ताने पत्र

चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी मोदींना लिहिले रक्ताने पत्र

67

चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी मोदींना लिहिले रक्ताने पत्र

चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी मोदींना लिहिले रक्ताने पत्र

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

राजुरा : 17 जून
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात माती उत्खनन करणार्‍या सीएपीएल कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याने त्यांनी न्यायासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. सहा-सात दिवस लोटूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असा इशारा अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दिला आहे.
राजुरा तालुक्यातील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात विविध कोळसा खाणीत कामी उत्खननाचे काम कंपनीला देण्यात आले. या कंपनीत शेकडो स्थानिक कामगार कार्यरत होते. कंपनीने अचानक केवळ स्थानिक कामगारांना पत्र पाठवून कामावरून कमी केले. त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. या अन्यायाविरूद्ध कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी स्वतःच्या रक्तदाने नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. या आंदोलनात ऋषी चौधरी, अजय इम्रपवार, श्रीकांत जलावार, पांंडूरंग मंगाम, आशिष पाझारे, माणिक संजीव, दशरथ कोंडावार, मिथून कांबळे, राहुल राठोड, विशाल सल्लाम, संकेत भादीकर, शंकर काळे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले आहेत.