पत्रकार तथा सिने अभिनेता दशरथ सुरडकर यांना आर्ट बीट्स फाउंडेशन पुणे यांच्या कडून यावर्षीचा “कला सन्मान पुरस्कार” जाहीर

✍मनोज एल.खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
सोयगाव : – सविस्तर वृत्त असे आहे की औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील मादणी या गावातून आपल्या कलेची सुरुवात करणारे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगून यशाला गवसणी घालणारे एका गरीब कुटुंबातील एक हरहुन्नरी कलाकार, पत्रकार, कवी साहित्यिक मराठी चित्रपट अभिनेता दशरथ सुरडकर यांना आर्ट बीट्स फाउंडेशन पुणे यांच्या कडून, अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा कलाक्षेत्रातला यावर्षीचा “कला सन्मान पुरस्कार” जाहीर झाला असून,तो पुढील महिन्यात पुणे येथे त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे “आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे यांच्याकडून त्यांना तसे “कला सन्मान पुरस्कार” जाहीर झाल्याचे अभिनंदन पत्र देऊन दशरथ सुरडकर यांना कळविण्यात आले आहे
आर्ट बिटस् फौंडेशन पुणे यांचे कडून आर्ट बिटस् महाराष्ट्र ” कला सन्मान ” पुरस्कार २०२२ साठी सिने अभिनेता म्हणून दशरथ सुरडकर यांची निवड झाली असून त्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र देऊन दशरथ सुरडकर यांचे अभिनंदन केले आहे.
दरवर्षी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्यात येते यावर्षीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. असे
संतोष पांचाळ संस्थापक, संचालक आर्ट बीट्स फाऊंडेशन पुणे, यांनी कळवले आहे
दशरथ सुरडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








