मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज ओझरचा श्री विघ्नेश्र्वरचा महिमा.

अष्टविनायक पाचवा गणपती  ओझरचा विघ्नहर सर्वाची विघ्ने हरणारा श्री विघ्नेश्र्वर गणपती.

ओझर:- महाराष्ट्र राज्यात पवित्र अशा अष्टविनायकातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा पाचवा गणपती  म्हणुन ओझरचा श्री विघ्नेश्र्वर गणपती  ओळखला जातो. त्याच्या मंगल दर्शनाने सर्व प्राणी मात्रांची सर्वाची विघ्ने दुर होते. महाराष्ट्राच्या शिक्षणाचे माहेर घर असलेल्या जि.पुणे जुन्नर पासून अवघ्या 17 किलोमीटर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.50 महामार्गाच्या रस्त्यांवर ओझर येथे श्री. विघ्नेश्र्वर मंदीर स्थित आहे. भक्ताच्या विघ्ने दुर करणा-या या विघ्नेश्र्वराची महिमा अर्पमपार आहे.

मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज ओझरचा श्री विघ्नेश्र्वरचा महिमा.
मिडिया वार्ता न्युज तर्फे अष्टविनायका तुझा महिमा कसा. आज ओझरचा श्री विघ्नेश्र्वरचा महिमा.

ओझर गावाची रोचक कथा..!

प्राचीन काळी हेमावती नगरीत अभिनंदन राजा राहात होता. त्याला इंद्रपदाची अभिलाषा लागली आणि त्यासाठी त्याने यज्ञ सुरु केला. ही माहिती स्वर्गातील इंद्राला कळाली तेव्हा तो घाबरला. त्याने हा यज्ञ पूर्ण होणार नाही यासाठी काळाचे स्मरण केले. आक्राळ-विक्राळ रुप धारण करुन काळ प्रकट झाला. इंद्राने त्याला राजा अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्याची आज्ञा केली. त्याने इंद्राची आज्ञा मानत अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणले आणि तो नाश केला. मात्र, तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने भुतलावरील वैदिक कर्मांचा नाश सुरु केला. धर्म आणि देवांवर हे मोठे संकट आले. त्यांनी गजाननाचा धावा केला. तेव्हा गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहात होते. देवांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या, गजाननाने विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला. आणि पाराशरपुत्र होऊन विघ्नासुरासोबत घनघोर युद्ध केले. गजाननाच्या सामर्थ्यापुढे विघ्नासुर शरण आला. त्याला गजाननाने आज्ञा केली की, ‘ज्या ठिकाणी माझे पुजन-भजन-किर्तन सुरु असेल तिथे तु जाता कामा नये.’ मग विघ्नासुराने एक वर मागितला की, ‘तुमच्या नावामागे माझे नाव असावे. विघ्नहर किंवा विघ्नेश्वर हे नाव धारण करुन येथेच वास्तव्य करावे. ‘तथास्तु म्हणून गजाननाने ‘विघ्नेश्वर’ नाव धारण केले आणि म्हणाले, ‘या नावाने जे कोणी जप करतील त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.’ मग देवांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली.

१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. मंदिराच्या चारही बाजूने दगडी तट आहे. मंदिराच्या आवारात दोन रेखीव दिपमाळा आहेत. मंदिराचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची असून पूर्णाकृती आसन मांडी घातलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here