डेंगू मलेरिया रोखण्यासाठी मनपा समोर *आम आदमी पार्टी* उभी – राजेश चेडगुलवार

*कोरपणा तालुका प्रतिनिधी निखिल पिदूरकर 9067769906*
दिनांक 17/9/2021 रोजी वडगाव ,लक्ष्मीनगर परिसरात डेंगू मलेरिया रोकधाम हेतू फाॅगिंग अभियान श्री राजेश चेडगुलवार आप मीडिया हेड जे ब्रदर (पुरुष अधिपरीचारक) आहेत यांच्या नेतृत्वामध्ये व श्री.वामनराव नंदूरकर काका यांच्या अध्यक्षतेखाली फाॅगिंग अभियान राबविण्यात आले. वाढत्या डेंगू मलेरिया चे प्रमाण बघता ज्या प्रकारे दिल्ली मध्ये पूर्वी असलेले 7000 डेंगू केसेस केजरीवाल सरकार ने 0-1 वर आणून ठेवले त्याच प्रमाणे आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुद्धा फाॅगिंग अभियान उत्स्फूर्तपणे सुरू आहे व जनता साथ देत आहे , कुठे तर आज पर्यत मनपा ने फाॅगिंग केली नाही असे ऐकीवात आले आणि मनपा ने फाॅगिंग केले तर एक दोनदाच केले असे ही ऐकन्यात आले.
मनपा ने गेल्या साडे चार वर्षांत डेंगू मलेरिया रोकधाम साठी योग्य ते काम न केल्या मूळे आज चंद्रपूर शहरामध्ये डेंगू मलेरिया चे रुग्ण वाढतांनी दिसत आहे. आम आदमी पार्टी चे फाॅगिंग अभियान बघता त्यांना कुठे तरी कमी पणा वाटत आहे म्हणून येन निवडणूकीच्या तोंडावर ते आता महिन्यातून 1 – 2 वेळा फाॅगिंग मारत आहे . गेल्या कित्येक दिवसांपासून आम आदमी पार्टी चंद्रपुर शहर व जिल्ह्यात फाॅगिंग अभियान राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडगाव वार्ड, लक्ष्मीनगर परिसर येथे फाॅगिंग करून जनतेला डेंगू मलेरिया रोकथाम हेतू माहिती देण्यात आली. या वेळी श्री. सुनील मुसळे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष, श्री. मयुर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष, श्री. चंदू माडूरवार शहर पदाधिकारी , अश्रफ अली सैय्यद , सिकंदर सागोरे, अमोल बल्की, श्रीराम जेंगठे, श्री विजय निकोडे तथा ईतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








