पोलीस अधिकाऱ्याची साडीने गळफास घेऊन आत्महत्या.

नागपूरमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याने सारेच हळहळले आहेत.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूरनागपूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास काटोल मार्गावरील वास्तुशिल्प सोसायटी येथे घडली.

विजय यादवराव चौधरी वय 57,असे मृतकाचे नाव आहे. ते विशेष शाखेत तैनात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास विजय हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. एक तासानंतरही ते घरी परतले नाहीत. दरम्यान, विजय यांच्या पत्नी वर्षा या त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर आल्या असता विजय हे साडीने गळफास घेतलेले दिसले. हे दृष्य पाहून वर्षा यांनी हंबरडाच फोडला. शेजाऱ्यांनी गिट्टीखदान पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी विजय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली आहे.‘ मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही’,असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. विजय यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गत काही दिवसांपासून ते तणावात होते, असे कळते. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here