एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

50

एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात
एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

बुलडाणा : – कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अमरावती आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय जिल्हानिहाय एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास, रोजगार व स्वयंरोजेगार मार्गदर्शन कार्यशाळा 15 डिसेंबर रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती चे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.राजेश बुरंगे यांचेहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे होते. तर प्रमुख उपस्थितीत सहायक आयुक्त, विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावतीच्या सौ.प्रांजली बारस्कर, वाशिमचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.योगेश पोहोकार, कला महाविद्यालयोच प्राचार्य डॉ.सुरेश बाठे होते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
प्रथम सत्रामध्ये डॉ.राजेश बुरंगे यांनी “राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तीमत्व विकास” या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित जिल्हयातील सर्व स्वयंसेवक युवक व युवतींना पीपीटी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण आपले व्यक्तीमत्व चांगल्या प्रकारे घडवू शकतो. या माध्यमातून समाजसेवा तसेच देशसेवा करण्याची संधी आपल्या सर्वाना मिळत आहे. याचा आपण अवश्य लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये सौ.प्रांजली बारस्कर यांनी “महास्वयंम पोर्टलवरील कौशल्य विकास व रोजगाराच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. महास्वयंम पोर्टलवरील उपलब्ध सुविधांची माहिती सांगून उमेदवारांना या पोर्टलवर रोजगार/स्वयंरोजगाराच्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत सांगीतले. पोर्टलवर नोंदणी करून उमेदवारांना सेवायोजन कार्ड, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार / स्वयंरोजगार कसा उपलब्ध करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी यांनी “स्वयंरोजगाराचे मार्ग व शासकीय योजना” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तदनंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी “अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयावर उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी सांगीतले. कार्यक्रमाच्या शेवटी कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन जिजामाता महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.ज्ञानोबा कांदे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.भरत जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.