गोसेखुर्द नहरात पडला ‘ रानगवा ‘ तिन तासांच्या रेस्क्यु नंतर रानगव्याला बाहेर काढण्यात यश

59
गोसेखुर्द नहरात पडला ' रानगवा ' तिन तासांच्या रेस्क्यु नंतर रानगव्याला बाहेर काढण्यात यश

गोसेखुर्द नहरात पडला ‘ रानगवा ‘

तिन तासांच्या रेस्क्यु नंतर रानगव्याला बाहेर काढण्यात यश

गोसेखुर्द नहरात पडला ' रानगवा ' तिन तासांच्या रेस्क्यु नंतर रानगव्याला बाहेर काढण्यात यश

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

नागभीड : 18 जानेवारी
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर परिसरातील गोसेखुर्द नहरात रानगवा पडल्याची घटना गुरुवारी, 18 जानेवारी रोजी सकाळी उजेडात आली. नहरात रानगवा पडल्याची माहिती कळताच वनविभाग व स्बाब संस्थाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान रात्रीच हा रानगवा ओपन नहरात पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजता पासुन रेस्क्यु मोहीम राबविण्यात आली. दोराच्या साहाय्याने तब्बल तीन तासानंतर रानगव्याला सुखरुप बाहेर काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी वनपरिक्षेत्रधिकारी हजारे, स्बाब संस्थाचे यश कायरकर, वनरक्षक गुरूदेव नवघडे, तथा नागरिक उपस्थित होते.

• धावपळीत एकाला दुखापत

नहरात पडलेला रानगवा वनविभाग, स्वाब संस्था तथा स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने नहराबाहेर काढल्यानंतर दोराने बांधलेला रानगवा पिसाळलेल्या अवस्थेत होता. परिणामी यावेळी तेथे उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. आणि या धावपळीत रानगवा हल्ला करेल म्हणून नागरीक सैरावैरा पळू लागले या धावपळीत ज्ञानेश्वर पडोळे नावाचे इसम गंभीर जखमी झाले.