शासकीय जागा वाचविण्यासाठी पत्रकार प्रसाद गोरेगांवकर करणार उपोषण

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-गोरेगांव ग्रामपंचायत हद्दीतील गांवतलावाशेजारी शासकीय जमिन वाचविण्याकरिता पत्रकार प्रसाद गोरेगांवकर दि. २६ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, माणगांव येथे उपोषण करणार आहेत.
गोरेगांव गांव तलावाशेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याची ६ गुंठे (सर्व्हे नं १९७) जागा असून या जागेत अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. या अनाधिकृत बांधकमाबाबत अनेकदा बातम्या प्रसारीत झालेल्या आहेत शिवाय पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी वांरवार सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव यांच्या सोबत पत्रव्यवहार करून लवकरात लवकर या जागेची मोजणी करून झालेले अनाधिकृत बांधकाम तोडून शासकीय जागा ताब्यात घेण्यास सुचविले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव येथुन कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी महाड येथील कार्यालयाशी देखील पत्रव्यवहार करुन संबंधीत जागेची मोजणी करण्यास सुचविले होते तसेच याची प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हाधिकारी यांना देखील त्यांनी पाठविलेली आहे.
या पत्रामध्ये (शासकीय ) सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेची मोजणी करुन सदर जागेवर झालेले अनाधिकत बांधकाम हटवून जागा शासनाच्या ताब्यात घ्यावी असे न केल्यास मला शासकीय जागा वाचविण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावावा लागेल असे नमुद केले होते परंतु या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर पत्रकार प्रसाद गोरेगांवकर हे जोपर्यंत या शासकीय जागेची मोजणी होत नाही तो पर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगांव येथे २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपोषणास बसणार आहेत.








