बाजारात सुट्टे पैशांची कमतरता, व्यवसायिकांसह, ग्राहकांची होत आहे गैरसोय

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- डिजिटल करन्सीच्या युगात आता सुट्टे पैसे मिळणे कठीण झाले आहे.यामुळे बाजापेठेतील छोटे मोठे व्यावसायिक यांना सुट्टे पैसे मिळत नसल्यामुळे व्यावसाय करणे कठीण झाले आहे. दहाच्या नोटा तर मार्केट मधून गायब झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे
अनेकवेळा आपण बाजारात वस्तु खरेदी करण्यासाठी जातो. यावेळी आपण दुकानदाराला ५०० रुपयाची नोट देतो. तो देखील सुट्ट्या पैशांची मागणी करतो.एसटी बस,रिक्षा, मिनिडोअर व इतर प्रवाशी वाहने सुट्ट्या पैशाची मागणी करीत असतात. परंतु आधुनिक काळातील डिजिटल युगात आपण जिपे, फोन पे आपण सहजपणे वापरत असतो. पण यामुळे सुट्ट्या पैशांची कमतरता निर्माण होतांना दिसत आहे.अनेकदा दुकानदारांना देण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे नसतात. काही वेळा तर सुट्टे पैसे नसल्याने घेतलेली एखादी वस्तू परत दयावी लागते. बँकेत गेले असता पुढून करन्सी येत नसल्यामुळे उपलब्ध नाही असे सांगतात
एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ५०० रुपयांच्या शिवाय नोटा निघत नाही ही नोट वस्तू खरेदीसाठी बाजारात घेऊन गेले असता बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध नसल्याने काही वेळा वस्तु खरेदी करू शकत नाही. स्पर्धेच्या युगात छोटे दुकानदार,पानटपट्टी धारक तसेच वडापाव व्यावसायिक यांना दोन तीन रुपयांवर व्यावसाय करावा लागत आहे.यामुळे सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे या व्यावसायिकांच्या व्यावसायावर परिणाम होतांना दिसत आहे. यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन रिजर्व बँकेकडे सुट्टी पैसे बाजारात उपलब्ध करण्यासाठी मागणी करणे गरजेचे झाले आहे लवकरच लवकर बाजारात सुट्टे पैसे उपलब्ध व्हावे अशी मागणी व्यावसायिकांसह ग्राहक वर्गातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here