Home latest News 19 फेब्रुवारीची सुट्टी साजरी करता यावी म्हणून 18 फेब्रुवारीलाच साजरी केली शिवजयंती

19 फेब्रुवारीची सुट्टी साजरी करता यावी म्हणून 18 फेब्रुवारीलाच साजरी केली शिवजयंती

124

19 फेब्रुवारीची सुट्टी साजरी करता यावी म्हणून 18 फेब्रुवारीलाच साजरी केली शिवजयंती

शासनाच्या मत्स्यव्यसाय खात्याची अजब त-हा.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-19 फेब्रुवारीची शिवजयंती सुट्टी साजरी करता यावी म्हणून शासनाच्या अखत्यारीतील मत्स्यव्यसाय आयुक्तालयाने 18 फेब्रुवारीलाच साजरी केली शिवजयंती. महाराष्ट्र फिशरमन कॉंग्रेस अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी ही बाब व्हीडीओ क्लीप प्रसिध्द करून लक्षात आणून दिल्याने सर्व़त्र खळबळ माजली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम तारखेच्या एक दिवस आधीच केवळ शासकीय सुट्टी उपभोगाला मिळावी म्हणून साजरा करणा-या मत्स्यव्यसाय आयुक्तालयाच्या या कृतीविरूध्द शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. विषेश म्हणजे या वेळी झालेल्या भाषणांमध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी त्यानिमीत्त मिळणा-या सुटीच्या शुभेच्छा देण्यांत आल्या आहेत.
महाराष्ट्र फिशरमन कॉंग्रेस अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी याबाबत बोलताना सांगितले की 19 फेब्रुवारी ही शिवजयंतीची शासनमान्य तारीख आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी असली तरी शिवजयंतीसाठी तास दोन तास खर्च करून सरकारी अधिकारी यांनी कार्यालयात येवून 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करणे योग्य ठरले असते. पण सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना सुट्टीचा एवढा हव्यास असतो की त्यांनी छत्रपतींचा जन्म एक दिवस आधीच मुक्रर केला असल्याची टिका नाखवा यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551(शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.