Home latest News यावर्षी माणगाव ग्रामीण पतसंस्थेच्या सभासदांची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिवाळी होणार गोड

यावर्षी माणगाव ग्रामीण पतसंस्थेच्या सभासदांची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिवाळी होणार गोड

74

यावर्षी माणगाव ग्रामीण पतसंस्थेच्या सभासदांची,रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिवाळी होणार गोड

दिपक दपके

माणगाव शहर प्रतिनिधी

मो, 9271723603

सहकार क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या माणगाव शहरातील नामांकित माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल तालुका माणगाव या पतसंस्थेचे २०२२ हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या पतसंस्थेच्या सभासदांची दिवाळी यावर्षी गोड होणार असून सभासदांना भेटवस्तू देण्याचा मानस संस्थेतर्फे करण्यात आल्याचे संस्थेचे कार्यतत्पर चेअरमन आनंदशेठ यादव यांनी सांगितले.यावेळी पतसंस्थेचे संचालक दिलीप आंबुर्ले,संचालक दिलीप जाधव,संचालक संदीप खरंगटे,व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड आदी उपस्थित होते.

माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था हि माणगावमधील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून संबंध रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. या संस्थेची स्थापना दि.१७ डिसेंबर १९९८ रोजी करण्यात आली असून पतसंस्थेचे हे २५ वे असे रौप्य महोत्सवी वर्ष सुरु आहे. पतसंस्थेच्या दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिवाळीत सभासदांना काही भेटवस्तू देण्याबाबत विषय चर्चेला आला.याकडे पतसंस्थचे चेअरमन आनंदशेठ यादव व सह्कारी सर्व संचालक मंडळ यांनी विशेष लक्ष देत पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी संस्थेच्या सर्व सभासदांना दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्याचे ठरविले असल्याने यावर्षी संस्थेच्या सभासदांची दिवाळी गोड होणार आहे.तरी याबाबत पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स निजामपूर रोड माणगाव याठिकाणी दि.२२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत समक्ष भेट देऊन आपली भेटवस्तू स्वीकारावी असे आवाहन पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे.