Home latest News राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

73

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

चंद्रपूर दि.18 नोव्हेंबर:- राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथून मुलकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता मूल येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता तालुका क्रीडा संकुल,मुल येथे मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता मुल येथून हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर कडे प्रयाण. रात्री 8 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव.

शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता एन.डी. हाॅटेल, बापट नगर येथे आगमन व मा. खा. शरद पवार यांच्यासमवेत डॉक्टर, वकील, उद्योजक यांच्यासमवेतच्या चर्चेस उपस्थिती. सकाळी 11 वाजता राजीव गांधी कामगार भवन, चंद्रपुर येथे आगमन व मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 12 वाजता जनता विद्यालय, सिव्हील लाईन येथे आगमन व मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पदाधिकारी बैठक व मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता जनता विद्यालय, सिव्हील लाईन,चंद्रपूर येथे मा.खा. शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 1.40 वाजता सर्किट हाऊस, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता सर्किट हाऊस, चंद्रपूर येथून हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर चंद्रपूर कडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता हिराई गेस्टहाऊस, ऊर्जानगर येथे आगमन व राखीव.

शनिवार, दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता हिराई गेस्ट हाऊस, ऊर्जानगर, चंद्रपूर येथून वर्धा कडे प्रयाण.