Home latest News तौक्ते वादळाचा वसई विरारला जबरदस्त तडाखा, 3 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी.

तौक्ते वादळाचा वसई विरारला जबरदस्त तडाखा, 3 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी.

76

तौक्ते वादळाचा वसई विरारला जबरदस्त तडाखा, 3 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी.

तौक्ते वादळाचा वसई विरारला जबरदस्त तडाखा, 3 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी.
तौक्ते वादळाचा वसई विरारला जबरदस्त तडाखा, 3 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी.

मनोज कांबळे नालासोपारा प्रतीनीधी✒
मुंबई/नालासोपारा:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याला सोमवारपासून अतिवृष्टी आणि वादळी वारेयांनी झोडपून काढले. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील पत्रा कोसळून सिध्दार्थ सिंग नामक 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वसई पूर्वेतील भोयादापाडा येथे इमारतीचा स्लॅब कोसल्याने अलागप्रसद यादव (41) तर पेल्हरजाबरपडा येथे मोठ झाड प्रवासी रिक्षावर पडल्याने मोहमद्द आलम मन्सुरी (51) या दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये झाड उन्मळून पडणे, कंपाऊंडच्या भिंती कोसळणे, रस्ते खचने यांसारख्या 80 हून जास्त घटना घडल्या असून त्यात 9 जण जखमी झाले आहेत.

पालघर बोईसर मुख्यरस्ता पावसामुळे खचल्याने सध्या बंद ठेवण्यात आला आहे . डहाणू तालुक्यातील 337 घर, पालघरआणि वाडा येथील दोन शाळांची वादळामुळे पडझड झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून वसईतील 57 कुटुंबातील 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल आहेत. वसईतील धुमाळनगर मधील एका इंडस्ट्रीयल गाळ्याला आग लागून लाखोंचा माल जाळून खाक झाला आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील 37 पैकी 9 सब- स्टेशन, 34 विजेचे खांबाची नासधूस झाल्याने जिल्ह्यातील बहुतेक भागातील विज सोमवारपासून खंडित झाली होती. तसेच सूर्यापाणी प्रकल्पातील पपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याने जिल्ह्यातील काही भागांना येत्या दिवसात पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. खंडित झालेल्या विजेचा मोबाईल नेटवर्क, केबल, आरोग्य सुविधायांवरही विपरीत परिणाम झाला होता. शहरातील हॉस्पिटलना जनरेटद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारीयांनी सोमवारी दिले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील लसीकरण केंद्र सोमवार पासून बंद ठेवण्यात आली आहेत.

सागरी सुरक्षा दलाने जिल्ह्यातील सातपाटी येथे ओएनजीसीच्या तेल विहिरवर अडकलेल्या 47 कामगारांची सुखरूप सुटका केली असून उरलेल्या 90 कामगारांची सुटका करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरूआहेत. आधीच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना वादळामुळे जिल्ह्यातील जनजीवन गेले दोन दिवस पूर्ण पणे विस्कळीत झाले होते. वादळामुळे झालेल्या पडझडीतून सावरण्यासाठी घरगुती विजेचे उपकरणं, पावसाळी सामानची दुकान पुढील दोन दिवस संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीमध्ये सुरक्षा आणि बचाव दलाला 1070 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन जिल्हा शासनाकडून करण्यात आल आहे.