Home latest News जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीव्दारे, महिला व बाल विकास विभागाच्या संस्थांना भेट

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीव्दारे, महिला व बाल विकास विभागाच्या संस्थांना भेट

39

गोंदिया, दि.19 : जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तपासणी समितीव्दारे दि.15 मे 2026 रोजी बालकांच्या काळजी घेणाऱ्या संस्था, शासकीय मुलांचे निरिक्षणगृह बालगृह आणि आसरा शिशुगृह (विशेष दत्तक संस्था) येथे भेट देवुन तपासणी करण्यात आली.

महिला व बाल विकास विभागाच्या शासकीय मुलांचे निरीक्षणगृह बालगृहामध्ये 6 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, पळून आलेले, हरवलेले, बालविवाह, बालकामगार म्हणुन मिळून आलेल्या काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना बालगृहात, तर विधीसंघर्षग्रस्त बालकांना निरीक्षणगृहात बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्या आदेशान्वये दाखल करण्यात येतात. तसेच 0 ते 6 वर्ष वयोगटातील अनाथ परित्यागीत आणि सोडून दिलेल्या बालकांना विशेष दत्तक संस्था (शिशुगृह) येथे दाखल करण्यात येतात. केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियाव्दारे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन सदर बालकांना दत्तकाकरिता मुक्त करुन दत्तक देण्यात येतात.

सदर संस्थाची तपासणी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय तपासणी समितीव्दारे संस्थांमध्ये उपलब्ध सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. बालकांकरिता भोजन व्यवस्था, निवारा, खेळाची साधने, मनोरंजन कक्ष, अभ्यास कक्ष, समुपदेशन कक्ष, अभ्यांगताकरिता बसण्याची व्यवस्था, बालकांची शैक्षणिक प्रगती आदी व्यवस्थेबाबत तपासणी करण्यात आली. सदर संस्था तपासणीच्यावेळी चाईल्ड हेल्प लाईन 1098 येथे भेट देऊन कॉल आणि कॉल रेकॉर्डींग व डॅशबोर्डवरील माहिती घेण्यात आली.

सुरक्षा रक्षक, काळजी वाहक तसेच चाईल्ड हेल्प लाईनच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी यावेळी निर्देश दिले. आसरा शिशुगृहाला (विशेष दत्तक संस्था) भेटी दरम्यान केंद्रीय दत्तक विधान प्रक्रिया पुर्ण करुन दत्तकास जाणारी 4 माहिण्याची एक बालिका जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दत्तकपुर्व संगोपनाकरिता रायपुर छत्तीसगड येथील एका पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास आधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, मानसोपचार तज्ञ डॉ. स्नेहा शर्मा, डॉ. सचिन उईके, शासकीय मुलांचे निरिक्षणगृह बालगृहाच्या अधिक्षीका मनिषा आंबेडारे, आचल फुलेकर, विनोदकुमार माने, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती खोब्रागडे, बाल कल्याण समितीच्या श्रीमती कापगते, श्रीमती हलमारे, श्रीमती बोकडे, श्री. रहांगडाले, परिविक्षा अधिकारी अनिल बांबोळे, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सर्व कर्मचारी व चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी उपस्थित होते.