Home latest News सितेपार येते प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा, आमदार संजय पुराम यांची मागणी 

सितेपार येते प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करा, आमदार संजय पुराम यांची मागणी 

29

आमगाव : तालुक्यातील सीतेपार परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी मार्गी लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, दुर्गम भागातील आरोग्य समस्या तसेच तातडीच्या वैद्यकीय सुविधांच्या अभाव लक्षात घेता आमदार संजय पुराम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन सीतेपार येते प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत निवेदन सादर केले. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित विभागाला सदर मागणी प्रस्तावित करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे सीतेपार परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सीतेपार व परिसरातील नागरिकांना किरकोळ आजारापासून ते गंभीर आजाराच्या उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. विशेषतः गर्भवती महिला जेष्ठ नागरिक बालके तसेच अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनते.

अशा परिस्थितीत सीतेफार येते प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास सीतेफार येते प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास केवळ उपचार सुविधाच नव्हे तर माता बाल संगोपन लसीकरण आरोग्य जनजागृती आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि विविध शासकीय आरोग्य योजनांच्या लाभ स्थानिक नागरिकांना अधिक प्रभावीपणे मिळू शकणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास परिसराचे आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार संजय पुराम यांनी ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य प्रश्नांना प्राधान्य देत सातत्याने पाठपुरावा केला आहे. लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी शासनाने अशा मागण्यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.