सिंदेवाहीत स्क्रब टाइफसचे दोन रुग्ण आढळले
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
सिंदेवाही, 19 ऑक्टोबर
शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील दोन रुग्णांना स्क्रब टाइफसची लागण झाल्याचा अहवाल मुंबईच्या पॅथालॉजी सेंटरमधून प्राप्त झाला. सध्या तालुक्यात मलेरियाची साथ सुरु आहे. दमट वातावरणामुळे इतर आजारांचे रुग्णही आढळून येत आहेत. ताप, सर्दी खोकल्याने ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी होत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील दोन रुग्णांची तपासणी केली असता, त्यांना स्क्रॅब टाइफस या जिवाणूजन्य आजाराची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले.