प्रा.अशोक घोडके यांना पीएच.डी प्रदान
केज प्रतिनिधी: केज शहरातील सरस्वती महाविद्यालयातील ग्रंथपाल अशोक माणिकराव घोडके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात पीएच डी. प्रदान केली.
या यशाबद्दल माऊली विद्यापीठाचे अध्यक्ष अशोकराव पाटील ,खा.रजनीताई पाटील, संस्थेचे सचिव आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे, सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. पाटील, डॉ.हनुमंत सौदागर, श्रीकांत लुंगारे, प्राध्यापक वृंद शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.
त्यांनी डॉ. दया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या संशोधन कार्यात महाविद्यालय ग्रंथालयाचे योगदान एक अभ्यास या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.









