केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केला तसा शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करावा – वसुदेव( बप्पा ) गायकवाड
केज/ प्रतिनिधी: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना ८ वा वेतन आयोग लागू केला आहे, त्याप्रमाणे देशातील सर्व शेतकर्यांसाठी 2006 पासून प्रलंबित असलेला स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता. केज जि. बीड चे संस्थापक कार्यवाह तथा जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव( बप्पा ) गायकवाड यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोज १५०० रुपये मिळत असताना देशातील शेतकर्यांनाही १०००, १२०० रुपये रोज मिळावेत अशी मागणी डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केली आहे.
एमएसपीसी नुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव/ बाजारभाव मिळणे आवश्यक आहे.
बि – बियाने, खते, किटकनाशके यांच्या वाढलेल्या किंमती पहाता आणि शेतकर्याने पोटच्या लेकराप्रमाणे पोसलेल्या, जोपासलेल्या पिकांच्या किंमत मात्र वाढत नाहीत.
शेतकर्यांच्या शेतीच्या मशागतीचा खर्च वाढतोय पण उत्पन्न वाढत नाही म्हणून देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा/ शेतकरी कर्जबाजारी होतोय/ आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतोय याची किमाण जाणीव ठेवून तरी केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोग लागू करून शेतीमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केली आहे.
केंद्रीय कर्मचारीही माणूसच आहे आणि शेतकरीही माणूसच आहे मग हा भेदभाव का ? असा प्रश्न आहे.
केंद्र शासनाने शेतकर्यांच्या लेकरांनाही शिक्षण घेता यावे, उच्च शिक्षित होता यावे, शेतकच्यां लेकरांची लग्न व्हावीत, तांचाही सुखाचा संसार व्हावा म्हणून तरी२००६ पासून प्रलंबित असलेला स्वामीनाथन आयोग शेतक र्यांसाठी लागू करावा व शेतमालाला हमीभाव/ बाजारभाव मिळावा अशी मागणी आनंद ग्रामिण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता. केज जि. बीड चे संस्थापक कार्यवाह, जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.









