महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा शाळेच्या विद्यार्थिनी जंपरोप स्पर्धेत भारतीय संघात देशाचे नेतृत्व करणार

33

महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा ता.केज जि. बीड शाळेच्या विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जंपरोप स्पर्धेत भारतीय संघात देशाचे नेतृत्व करणार

केज: नुकत्याच पार पडलेल्या रीवा,मध्यप्रदेश येथे झालेल्या 22 वी जूनियर राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात महाराष्ट्र विद्यालय बनसारोळा येथील खेळाडूंनी सिंगल रोप स्पीड रिले सांघिक प्रकारात वैभवी बालासाहेब सोनके ,मुक्ताई अण्णासाहेब पारेकर ,पल्लवी अमिताभ गोरे यांनी कांस्यपदक पटकावले आहे.

तसेच चीन किंवा थायलंड या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांच्या या यशाबद्दल बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे सर, अध्यक्ष श्री.भागवत दादा गोरे तसेच संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. काकडे आर एम सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शक श्री.मनेश गोरे सर व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्वांकडून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.